Breaking News

रोडच्या समस्येबाबत तालुक्यातुन मनसेचे पहिलेच आक्रमक आंदोलन;राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील काचा फोडल्या !रोडच्या समस्येबाबत तालुक्यातुन मनसेचे पहिलेच आक्रमक आंदोलन;राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील काचा फोडल्या


पाथर्डी/प्रतिनिधी :
       पाथर्डी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व शहरातील ईतर रस्त्यावर मोठया प्रमाणावर वर्दळ असुन मोठ्याल्या "खड्याचे रूपांतर छोट्या तळ्यांमध्ये"झाल्याने शहरातील बेरोजगार तरुणांना मासेमारी व काठावर पर्यटन व्यवसायासाठी परवानगी मिळावी या विषयांच्या अनुषंगाने मनसेच्या वतीने आज राष्ट्रीय महामार्ग कार्यालाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलाचा हार घालून कार्यालयातील काच फोडत निषेध नोंदवण्यात आला.तर नगरपरिषदेत शहरातील क्रांती चौक व चिंचपुर रोडवरच्या प्रश्नावरून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना घेराव घालण्यात आला.
         सदरील आंदोलन मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ व मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाठ , शहर सचिव संदीप काकडे,राजू गिरी,सोमनाथ फासे,जयंत बाबर,गणेश कराडकर, एकनाथ सानप,संजय चौनापुरे,एकनाथ भंडारी,रंगनाथ वांढेकर,बाबासाहेब सांगळे आदीच्या सह्या निवेदनावर आहेत.
 
              यावेळी मुख्याधिकारी यांनी आंदोलन कर्त्याच्या भावना समजून घेण्यास उदासीनता दाखवल्याने व नगरपरिषदेचे अभियंता यांनी हे काम आमचे नसुन पी डब्लू चे असल्याचे सांगितल्याने मनसेचे संतोष जिरेसाळ,अविनाश पालवे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.त्याच वेळी पाथर्डी पोलीस ठाण्याचे हवालदार अरविद चव्हाण व गोपनीय विभागाचे भगवान सानप यांनी आंदोलकात व अधिकाऱ्या मध्ये मध्यस्थी करत वाद मिटवला.
  
  त्यानंतर मनसेचे पदाधिकारी हे राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात रोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांना तिथे कुठल्याही प्रकारचा अधिकारी मिळून न आल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथिल खुर्चीला हार घालत.तेथील काचाची तोड फोड करत निषेध नोंदवला..

   सदरील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबतीत अनेक वेळा अनेक पक्षांनी आंदोलन केले असले तरी आजपर्यंत हे काम मार्गी लागले नाही.प्रत्येकवेळी वेळ मारून नेण्यासाठी आंदोलकना आश्वासना दिले जाते.थातूरमातूर काम करून पुन्हा रोडची परिस्थिती जैसे थे तशीच राहते.आणि पुन्हा कोणाला तरी आंदोलन करावे लागते.तसेच या महामार्गा नीट नसल्याने अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या ४ वर्षांपासून हा प्रश्न मार्गी न लागल्याने पाथर्डीकराना आल्हाददायक प्रवासाचा अनुभव मिळतो की नाही आता देवची जाणे.