Breaking News

कोपरगाव मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकाची ११० रुपयेला उघड उघड विक्री करुन लुट तर पावती तिकीटे चक्क पान टप-यांवर !

कोपरगाव मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकाची ११० रुपयेला उघड उघड विक्री करुन लुट तर पावती तिकीटे चक्क पान टप-यांवर

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
     कोपरगाव शहरात १०० रुपयांच्या मुद्रांक ची विक्री १० रुपये जादा घेऊन तसेच ५ रुपयांचे न्यायालयीन तिकीट ७ रुपयाला विकले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
  नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची शासकीय व्यवहारातील कामे करण्यासाठी शासकीय फी म्हणून वेगवेगळ्या किमतीचे मुद्रांक तसेच न्यायालयीन तिकिटे यांची गरज भासत असते प्रतिज्ञापत्र करणे, कुठलाही प्रकारचा अर्ज देणे बँकेशी निगडीत कामे, शैक्षणिक कामे, खरेदी विक्री व्यवहार अशा विविध कामांसाठी मुद्रांक व न्यायालय तिकीट यांची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असते. मुद्रांक व न्यायालयीन तिकिटे यांची किंमत त्याच्यावर मुद्रित केलेले असते किंमत अदा करून जनतेला या गोष्टी उपलब्ध करून देणे हे मुद्रांक विक्री करणाराचे काम आहे तसेच कायद्यानुसार व शासनाच्या निर्देशानुसार सर्व गोष्टीचे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. निर्धारित वेळेत जनतेला विना सायास वरील प्रमाणे मुद्रांक व तिकिटे उपलब्ध करून देणे. परंतु कोपरगाव शहरामध्ये शासनाच्या आदेशाची मुद्रांक विक्रेत्यांकडून पायमल्ली होताना दिसत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे. दिवसाढवळ्या तहसील कचेरीच्या आजुबाजूला ह्या गोष्टी घडत असताना प्रशासनाच्या लक्षात येत कसे नाही एवढ्या सहजासहजी व बिनधास्तपणे जादा पैसे घेण्यापर्यंत मुद्रांक विक्रेत्यांची मजल जाते म्हणजे यामागे नेमके कुणाचे पाठबळ आहे की काय अशी शंका येते.तर ५  रुपये व इतर पावती तिकीटे स्टॕप वेंडर कडे न मिळता पान टपरी,कीराणा दुकानात मिळते यांना अशा तिकीट विक्रीची परवानगी ,परवाना आहे का हाही प्रश्नच असुन येथेही  ५ रुपयाचे तिकीट ७ रुपयाला मिळत असुन    याची उच्चस्तरीय त्वरित चौकशी होऊन हा काळाबाजार थांबविण्यात यावा व जनतेची दिवसाढवळ्या होणारी लूट थांबवावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.