Breaking News

कोपरगाव चा कोरोना रुग्णाचा आकडा हजारी कडे !

कोपरगाव चा कोरोना रुग्णाचा आकडा हजारी कडे !

करंजी प्रतिनिधी- 
    आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण ५५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २० बाधित तर ३५ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच कोपरगाव प्रशासनाने चार दिवसाच्या लॉकडाउन कालावधी मध्ये घरोघरी केलेल्या तपासणी सर्व्हेत नगर येथे ७९ संशयितांचे स्राव तपासणी साठी पाठवलेले होतें त्या पैकी ३९ अहवाल पॉजिटीव्ह तर ४० अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. 
    असे आज २ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ५९ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.
    आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २४ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
    आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ९२५ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४६  झाली आहे.
    आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या १८ झाली असून आज त्यात कोपरगाव येथील गोरोबानगर मधील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.