Breaking News

काळे कोल्हेंनी ऊस उत्पादकांना तातडीची मदत करावी, पढेगांवचे काळे कोल्हे समर्थकांसह शेतकऱ्यांची एकरी दहा हजार मदतीची मागणी !

काळे कोल्हेंनी ऊस उत्पादकांना तातडीची मदत करावी, पढेगांवचे काळे कोल्हे समर्थकांसह शेतकऱ्यांची एकरी दहा हजार मदतीची मागणी !


कोपरगाव प्रतिनिधी-
    ऊसाचे आगार म्हणून जिल्ह्यात कोपरगाव तालुका सुपरिचित आहे.येथिल शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि नेत्यांचे राजकारण बहुतांशी ऊसाच्या भोवतीच खेळत असते.दरवर्षी तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करतात.या कारखान्यांमुळे राज्यात सहकार क्षेत्रात कोपरगाव तालुक्याने नावलौकिक मिळविला आहे.या आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने सर्वच पिके भुईसपाट झाली आहे.त्यात उभे ऊसाचे पिकही आडवे झाल्यामुळे पढेगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या परिस्थितीत तालुक्याची धुरा सांभाळणारे काळे आणि कोल्हेंनी शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरविण्याची कैफीयत दै.लोकमंथनकडे मांडली आहे.
             मोठ्या हिमतीने आणि मेहनतीने  उभे केलेले ऊसाचे पिक वादळी वारे आणि पावसाने भुईसपाट झाले असुन साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांनी नोंदवलेला देखील आहे.मात्र कारखान्याचे गाळप सुरु होण्यास वेळ असुन,तोपर्यंत या ऊसाचे पाचट आणि खोडकी होण्याची शक्यता आहे.मातीशी गाठ पडलेल्या ऊसाला अळ्यांचा प्रादुर्भाव पोखरणार असल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी होणार असल्यामुळे याशिवाय ऊसाचे पिकासाठी नुकसान भरपाई शासनाकडून  देण्यात येत नसल्यामुळे यातुन सावरण्यासाठी बेणे खर्च आणि मशागत खर्चापोटी किमान एकरी दहा हजार रुपयांची तातडीने मदत करावी अशी पढेगाव येथील आपत्तीप्रसंगी एकत्रित जमलेले ऊस उत्पादक शेतकरी आणि विशेषतः काल्हेंचे कट्टर समर्थक उत्तमराव चरमळ आणि काळेंचे कट्टर समर्थक भानुदास शिंदे ,विजय कदम,संपत तरटे आदींसह अनेक शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे.
                        
ऊसाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नाही.परंतु ऊसाची स्वतंत्र यादी तयार करुन कारखान्याकडे देण्याचे तहसिलदारांनी सांगितले आहे.
------------
एस.एम.गावित
(कृषि पर्यवेक्षक,तालुका कृषी कार्यालय कोपरगाव)