Breaking News

सौ भिंगारे यांची भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी निवड

सौ भिंगारे यांची भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी निवड


करंजी प्रतिनिधी- 
नुकतीच भारतीय जनता पार्टी ची उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र  गोंदकर यांनी जाहीर केली असून यात करंजी येथील माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे यांच्या एकनिष्ठ समर्थक सौ विनिता ताई संतोष भिंगारे यांची उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड जाहीर झाली आहे.
   सौ भिंगारे या करंजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष भिंगारे यांच्या पत्नी आहे. त्यांचा या निवडीबद्दल मा आ भाजप प्रदेश सचिव स्नेहलता ताई कोल्हे, संजीवनी साखर कारखाना चेअरमन बीपीनदादा कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे तसेच करंजी व पंचक्रोशीतील भाजपा समर्थकांनी सौ भिंगारे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.