Breaking News

मोदी सरकारने कोरोनाच्या निमित्ताने संधी साधली राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल !

 


नवी दिल्ली । काँग्रेसचे पुर्व अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. कोरोना, लॉकडाऊन, बेरोजगारी, जीडीपी अशा अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवरून राहुल गांधी आपले भाष्य करीत आहे. आज त्यांनी पुन्हा मोदी सरकारवर निशाना साधला आहे. राहुल यांनी ट्विटर करत म्हटले आहे की, "कोरोनाच्या काळात भाजप सरकारने एकापेक्षा एक दावे केले होते. त्यामध्ये 21 दिवसात आम्ही कोरोनाला हरवून दाखवू, आरोग्य सेतू अँप्स नागरिकांची कोरोनापासून सुरक्षा करेल, 20 लाख कोटीचे पॅकेज, त्यानंतर भारतीयांनो आत्मनिर्भय बना, भारतीय सीमेवर कोणी घुसखोरी केली नाही आणि कोरोनाची धोका आटोक्यात आला आहे. यामध्ये एकही दावे सत्य झाला नसुन, मोदींनी 'आपत्तीत संधी' मिळवली.' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल यांनी मोदी सरकारच्या लॉकडाऊन आणि त्यादरम्यान केलेल्या दाव्यांवर टिका केली आहे. "कोरोना काल में भाजपा सरकार ने एक से एक ख़याली पुलाव पकाए" असे ट्विट करत त्यांनी मोदी सरकारच्या योजनांविषयी भाष्य केले आहे. 21 दिवसात कोरोनाला देशातून हद्दपार करू असे मोदी सरकारने म्हणत लॉकडाऊन जाहीर केला होता. पण कोरोनाला हद्दपार करण्यात मोदी सरकार अयशस्वी ठरली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात 20 कोटींचं पॅकेज जारी करण्यात आलं. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने देशवासीयांनो आत्मनिर्भय बना. त्यांनंतर देशात कोरोनाचा धोका आटोक्यात आला. असे भाष्य मोदी सरकार करीत आहे. मात्र यामध्ये फक्त एकच गोष्ट खरी आहे ती म्हणजे; मोदींनी "आपत्तीत संधी" साधली. असे राहुल गांधीनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे.