Breaking News

अभिनेत्री कंगणा रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना

 Kangana Ranaut gets Y level security from home ministry amid spat with Shiv  Sena MP Sanjay Raut | Celebrities News – India TV

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मुंबईची तुलना POK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर अशी केली होती. तसेच मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदरची तक्रार शिवसेना आईटीसेल विभागाच्या मार्फत करण्यात आली आहे.

मुंबईतील आर्थिक केंद्र तसेच मोठी कार्यालय गुजरातमध्ये हलवण्यात आली आहेत. अशा प्रकारच वातावरण निर्माण करून मुंबईची शान असणारे बॉलिवूड इतर कुठे हलवण्याचा कट तर मुंबईद्रोही लोक किंवा एखादा राजकीय पक्ष शिजवताना दिसत नाही ना? याचा सखोल शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर चौकशीत कंगनाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे निष्पन्न झाले.

तर शिवसेना व आयटीसी त्यांचा मानसोपचार तज्ञाकडे मोफत उपचार करून देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर माजी परिवहन सभापती दशरथ यादव, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा आयटी सेना संघटक एड. शैलेश कदम यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला असून ठाणे पोलिसांनी लवकरात लवकर त्याचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.