Breaking News

महादजी शिंदे पतसंस्थेचे चेअरमन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्रीकृष्ण येणारे यांच्या निधनाने सुपा परिसर हळहळला !

महादजी शिंदे पतसंस्थेचे चेअरमन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्रीकृष्ण येणारे यांच्या निधनाने सुपा परिसर हळहळला


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील रायतळे येथील श्रीकृष्ण उर्फ आबा मळूजी येणारे यांचे काल ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनामुळे सुपा पंचक्रोशी वर शोककळा पसरली आहे ते दिलदार व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते राजकीय सामाजिक शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांच्या पश्चात मुलगा इजि. विजय येणारे डॉ. अजय येणारे पत्नी राधाबाई येणारे व सुना नातवंडे असा परिवार आहे.
कै.श्रीकृष्ण येणारे यांचे शिक्षण सुपा येथील हायस्कूलमध्ये झाले होते त्यानंतर त्यांनी अहमदनगर कॉलेजमध्ये पदवी घेतली कबड्डी या खेळामध्ये राज्यस्तरावर खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवली त्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत नोकरी,केली सहसा नगर शहरातील शाखांमध्ये च नोकरी करावी लागली.
त्या कालावधीमध्ये माजी खासदार बाळासाहेब विखे, माजी आमदार नंदकुमार झावरे, माजी आमदार कै. बाळासाहेब भगत, विठ्ठलराव शेळके, अण्णा पाटील शिंदे, यांच्याबरोबर राजकीय सहवासात ते राहिले होते या सर्वांशी त्यांचे घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रायतळे या गावांमध्ये विविध राजकीय पदे भूषवता आली त्यांच्या पत्नीही रायतळे गावच्या सरपंच राहिल्या होत्या रायतळे येथे माजी खासदार कै.बाळासाहेब विखे माजी आ.नंदकुमार झावरे पाटील माजी आमदार कै. बाळासाहेब भगत माजी जि  प. सदस्य. कै.अण्णासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी बरीच सामाजिक पाटबंधारे व कृषी विभागातील अनेक कामे मार्गी लावली.
काही वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर त्यांनी सामाजिक कामांना हातभार लावण्यास सुरुवात केली त्यांना सामाजिक कामाची प्रचंड आवड असल्याने त्यांनी त्यात स्वतःला गुंतवून घेतले होते केळगाव येथे वास्तव्य असल्याने तेथे त्यांनी महादजी शिंदे पतसंस्था स्थापन केली होती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन होते त्या माध्यमातून देखील त्यांनी अनेक घटकांना मदत केली.
रायतळे व परिसरातील सर्व मित्रांच्या सुख दुःखात सहभागी राहणारे व्यक्तिमत्त्व होते त्याच्या अचानक निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.