Breaking News

बेल्हे राळेगण थेरपाळ रस्ता आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून !

बेल्हे राळेगण थेरपाळ रस्ता आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून !
-----------  
पत्रकार परिषदेमध्ये तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे व सुदाम पवार यांची माहिती.
-----------
केंद्रीय परिवहन व रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे आमदार निलेश लंके यांचा पाठपुरावा.
------------
तालुक्यातील टक्केवारी पुढाऱ्यांचा रस्त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न.


पारनेर प्रतिनिधी - 
     बेल्हे राळेगण थेरपाळ रस्ता केंद्रीय परिवहन रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे आमदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केल्यानंतर मंजूर झाला आहे मात्र याबाबत तालुक्यातील टक्केवारी पुढारी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे असा आरोप पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे व निलेश लंके प्रतिष्ठान चे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार यांनी केला आहे
पारनेर विश्रामगृहावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे व सुदाम पवार त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली यामध्ये बेल्हे राळेगण थेरपाळ हा रस्ता केंद्रीय परिवहन रस्ते महामार्ग मंत्री नितींजी गडकरी यांचेकडे आमदार निलेश लंके यांनी आमदार झाल्यानंतर  शिरूर राळेगण थेरपाळ मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761 हा घोषित झाला असून हा महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठविला होता त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले असून,त्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761 त्या आशयाचे अधिसूचना भारत सरकारच्या सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाकडून दि 06 फेब्रुवारी 2018 रोजी निर्गमित झालेली आहे.
      याबाबतचा पाठपुरावा पुणे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांनी 17 नोवेंबर 2018 रोजी ज्येष्ठ नेते पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्याकडे केली होती.तसेच त्यावेळेचे नगरचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांच्याकडे 10 ऑक्टोबर 2017 रोजी केली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग होण्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. व त्यांच्या मागणी नुसार महाराष्ट्र शासना मार्फत अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सुपूर्द केलेले आहे .
        निलेश लंके आमदार झाल्यानंतर 24 जून 2020 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तसेच मागील पंधरा दिवसापूर्वी नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा (टप्पा दुसरा) मंजूर होण्यासाठी मागणी केली होती.त्यावेळी गडकरी सदर कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द आमदार निलेशजी लंके यांना दिला आहे.
      सदरचा रस्ता हा पद्मभूषण अण्णासाहेब हजारे खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे.परंतु त्याचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे. या संबंधित सर्व कागदपत्रे व पुरावे हे आज पत्रकार परिषदे समोर मांडली
यावेळी वनकुटे चे सरपंच राहुल झावरे निघोजचे सरपंच ठकाराम लंके किसन रासकर बाबाजी भंडारी बाजीराव कारखिले आदी उपस्थित होते.