Breaking News

भाविकांना दर्शनासाठी त्वरित मंदिर खुले करा :- मनसे

भाविकांना दर्शनासाठी त्वरित मंदिर खुले करा :- मनसे 


राहाता प्रतिनिधी :
    शिर्डीचे साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी त्वरित खुले करावे ,संस्थान कर्मचारी वेतन कपात करू नये आदी मागण्या संंदर्भासाठी मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत साईबाबा संस्थान मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले .
           यापूर्वी  मनसेच्या वतीने साईबाबा मंदिर खुले करण्यासाठी संदर्भात कार्यकर्तेनी आंदोलन केले.संस्थानाने स्पष्ट केले की जो पर्यंत शासनाचा आदेश येत नाही तो पर्यंत मंदिर बंद राहील असा पावित्र्य घेतला होता त्याच अनुषंगाने रविवारी  मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत आंदोलन करण्यात आले ह्या आंदोल यशस्वी होण्यासाठी शिर्डी ,नगर जिल्ह्याचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते मंदिर खुले करण्यासाठी मागण्याचे निवेदन संस्थानचे कार्यकारी अधिकारी कांन्हुराज बागाटे यांना देण्यास आले यावर संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले शासनाचे कुठलेही आदेश झालेले नाही आदेश प्राप्त होताच मंदिर खुलेकरण्यासाठी पाऊले उचलली जातील आपले म्हणणे आम्ही शासना पर्यंत पाठऊ यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.