Breaking News

स्थळ पाहणी दाखल्या बाबत अहमदनगर जिल्हा परिषद विरुद्ध अभिनव आंदोलन !

स्थळ पाहणी दाखल्या बाबत  अहमदनगर जिल्हा परिषद विरुद्ध अभिनव आंदोलन !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
           अहमदनगर जिल्हा परिषदेचे   मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी दिनांक १५/९/२०२०  रोजी   स्थळ पाहणी दाखल्यासाठी जे परिपत्रक काढले ते पूर्णपणे  बेकायदेशीर असुन त्या परिपञका विरोधात  सध्या कोरोणामुळे कायदेशीर  किंवा सनदशीर मार्गाने निषेध करणे सोपे राहिले नाही त्यामुळे माहितीच्या अधिकाराचा हक्क वापरून  संपूर्ण जिल्ह्यातून ई-मेल वापरून मुख्यकार्यकारी अधिकारी  तसेच कार्यकारी अभियंता यांना माहितीच्या अधिकाराचा फॉर्म वापरुन ई-मेल व स्पीड पोस्टने पाठवत जिल्ह्यातील इंजिनियर अनोखे आंदोलन करणार असल्याची माहीती इंजिनियर सतीश वराळे यांनी दिली.
   इंजिनियर सतीश वराळे माहीती देताना म्हणाले की    नवीन इंजिनियर्स ज्यांना  प्रशासनाचा अनुभव नाही त्यांना  तथाकथित परिपत्रक हे कायदेशीर वाटत असेल परंतु ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे स्थळ पाहणी दाखला गेले  तीन महिने जिल्हा परिषद प्रशासन बेकायदेशीररीत्या ही  योजना राबवत आहे  व संपूर्ण जिल्हा परिषद सामूहिकरीत्या शासनाची  उघड उघड फसवणूक करीत आहेत  याचे कारण की  आपण  संघटित नाही त्यामुळे असा अन्याय  उघड उघड  करण्याचे धारिष्ट्य मुख्य कार्यकारी अधिकारी करीत आहेत कार्यकारी अभियंता जो जिल्हा परिषदेचा तांत्रिक मुख्य आहे यांची देखील गणना अंगणवाडी सेविका बरोबर केली हे म्हणजे ( नामा  पेक्षा क्रियापद मोठे  समजणे वाले को इशारा काफी )  कार्यकारी अभियंता या  परिपत्रकानुसार जिल्हा परिषद चे इंजिनियर्स निकम्मे  आहेत  ते घरी बसून कामाची पाहणी न करिता अंदाजपत्रक तयार करतात असे जे काही चित्र उभे केले आहे त्याचा आम्ही  निषेध करतो जिल्हा परिषदेचे इंजिनीयर्स त्यांच्या क्षमतेपेक्षा जादा काम करतात   यामध्ये कोरोना  काळातही काम करणारे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता  श्री गीते साहेब यांचा मृत्यू झाला परंतु याची जाणीव तथाकथित प्रशासकीय प्रमुख म्हणवणाऱ्यांना नाही या अभिनव आंदोलनात जिल्ह्यातील अनेक इंजिनियर  सहभागी होऊन ई-मेल पाठवणार असुन जिल्हा परिषदे विरोधात लवकरच औरंगाबाद हायकोर्टात याचीका दाखल करणार असल्याचे श्री.वराळे यांनी  सांगितले