Breaking News

राहाता तालुक्यात कोव्हीड १९ रुग्णात दिवसेंदिवस वाढ !

राहाता तालुक्यात कोव्हीड १९ रुग्णात दिवसेंदिवस वाढ !


शिर्डी प्रतिनिधी :
     राहाता तालुक्यात कोव्हीड१९ या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत
असून त्यामुळे तालुक्यातील विविध गावात कोरोनाच्या रॅपिड टेस्ट
घेण्यात येत आहेत,  राहाता
तालुक्यात दिवसभरात ठिक ठिकाणी रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या,
त्यापैकी एकुण 9 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर
शिर्डीत आत्तापर्यंत 286 व्यक्ती कोरोना बाधित झालेल्या असून
त्यामध्ये 264 व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेले आहेत, तर एक जण
कोरेणामुळे मयत झाला असून सध्या 21 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राहत्या चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे, राहाता तालुक्यात दररोज कोरोनाच्या रॅपिड टेस्ट वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, त्यामुळे कोरोना रुग्णांची तपासणी झटपट होत आहे व कोरोना बाधित रुग्ण त्वरित आढळून येत असून आज राहता तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी ,कोरोना टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 9कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
         या 9 कोरोना बाधित रुग्णांमध्ये निमगाव निघोज येथे 4 कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले तर शिर्डी राहता, राजुरी, पिंपरी निर्मळ, लोणी खु.येथे प्रत्येकी 1कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे, असे एकूण 9 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले असल्याची
माहिती राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे,तसेच
शिर्डीमध्ये आत्तापर्यंत 286 व्यक्ती कोरोना बाधित झाल्या असून
त्यामध्ये एक व्यक्ती मयत झाली आहे तर 264 व्यक्ती बरी होऊन घरी
गेले असून सध्या 21 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती
तहसीलदार कुंदन हिरे यांनी देत, दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची
संख्या वाढतच चालली आहे, त्यामुळे नागरिकांनी कोरोना संदर्भात
अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तसेच सामाजिक दुरी, मास्क वापरणे ,या गोष्टी नागरिकांनी करणे गरजेचे आहे , विनाकारण कुठेही गर्दी करू नये, कामा निमित्तच बाहेर पडावे, असेही आवाहन राहातातहसीलदार व इन्सिडेंट अधिकारी कुंदन हिरे यांनी केले आहे,