Breaking News

पारनेर तालुक्यातील आज ३० अहवाल पॉझिटिव्ह १०६ निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यातील आज ३० अहवाल पॉझिटिव्ह १०६ निगेटिव्ह !
-------
पारनेर जवळा कान्हूर पठार येथे वाढत आहे कोरोनाचा संसर्ग !
-------
तालुक्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१ वर !
---------
पारनेर शहरातील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची बाधा !
-------


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील दि १ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यातील ३० अहवाल पॉझिटिव्ह तर १०६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये पारनेर शहर ७ निघोज ४ गोरेगाव १ टाकळी ढोकेश्वर ६ जवळा १ सिद्धेश्वरवाडी ४ कान्हूर पठार १ अस्तगाव १ कर्जुले हरेश्वर १ सुपा १ पुणेवाडी १ पिंपरी जलसेन १ लोणी हवेली १  या गावातील अहवालांचा समावेश आहे .
तर १०६ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहेत यात तालुक्यातील जवळा १९ राळेगण-सिद्धी १० गुणोरे ८ कान्हूर पठार ६ टाकळी ढोकेश्वर २ वाळवणे २ पारनेर शहर १६ वडगाव दर्या १ हंगे १ भाळवणी २ बाबुडी ७ सिद्धेश्वर वाडी ६ अस्तगाव ८ लोणीमावळा १ सुपा २ नारायणगव्हाण १ निघोज २ पळवे १ रुई छत्रपती ४ कुरुंद ५ राळेगण थेरपाळ १ देवीभोयरे १ या गावांतील व्यक्तींचा निगेटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येतील त्यांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व त्याची चाचणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत आहे तालुक्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २१ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ७५० हून अधिक कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
रॅपिड किट सध्या उपलब्ध नसल्याने संसर्गात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्याची गती मंदावली आहे त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही कमी येत आहे मात्र रॅपिड किट उपलब्ध होतच संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील पारनेर जवळा कान्हूर पठार याठिकाणी कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे मात्र याकडे तेथील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे अद्याप दिसून येत आहे.
तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत ते रुग्ण राहत असलेल्या १०० मीटर चा परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.