Breaking News

कोपरगाव ते अहमदनगर राज्य मार्ग दुरुस्त करावा !

कोपरगाव ते अहमदनगर राज्य मार्ग दुरुस्त करावा
-----------
मुख्यमंत्र्यांन कडे आदिनाथ ढाकणे यांची मागणी


करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव अहमदनगर प्रमुख राज्य मार्ग क्रं-१० याची अवस्था फार वाईट झाली असून लवकरात लवकर शासनाने यात लक्ष घालून दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठान चे आदिनाथ ढाकणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

   सध्या राज्य कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराला तोंड देत असून दररोजच्या वाढत्या कोरोना  संख्येने परिस्थिती अवघड होत चालली आहे . कोपरगाव तालुक्याने कोरोना रुग्णाच्या संख्येत कधीच बाराशेचा टप्पा पार केला आहे.तर तालुक्यातील कोरोना ने मृत्यू पावलेल्याची संख्या २३ झाली आहे.
  
    कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी कोपरगाव प्रशासनाकडून सुरू असलेले  कोविड केअर सेंटर मधील सर्व आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता चांगल्या पद्धतीने  रुग्णांवर उपचार करत आहे परंतु काही  रुग्णाची हालत नाजूक झाल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवावे लागते परंतु कोपरगाव अहमदनगर या रोड ची परिस्थिती बघता त्यांना लवकर उपचार मिळणे अवघड होतं चाले आहे या खड्डेमय रोड मुळे अँम्बुलन्स चालक त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल नाही करू शकत त्यामुळे तालुक्यातील बहुतांश  मृत्यू ला कारणीभूत कोपरगाव नगर हा राज्य मार्ग ठरला आहे त्या मुळे या जीवघेण्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी ढाकणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,पालक मंत्री हसन मुश्रीफ, आमदार आशुतोष काळे,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , तहसीलदार योगेश चंद्रे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता याना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.