Breaking News

पारनेर शहरात कोरोना प्रतिबंधक योजनेचा प्रशासनाकडून फज्जा उडाला !

पारनेर शहरात कोरोना प्रतिबंधक योजनेचा प्रशासनाकडून फज्जा उडाला !
-----------
नगरपंचायत प्रशासनाकडून होत आहे दुर्लक्ष.
-------
नगरपंचायतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन.
----------
मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांचा इशारा.


पारनेर प्रतिनिधी-  
    पारनेर नगरपंचायतीने शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी नगरपंचायत च्या वतीने शहरांमध्ये कोणतीही दखल घेतली जात नाही नगरपंचायत प्रशासन याबाबत गांभीर्याने घेत नाही नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नसताना देखील नगरपंचायत प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही याबाबत गांभीर्याने घ्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष वसिम राजे यांनी दिला आहे.
              यासंदर्भात नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे.शहरात  नागरीक,व्यवसायीक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहेत.सामाजिक अंतर,मुखपट्टीचा वापर, निर्जंतुकीकरण आदि उपाययोजनांचा फज्जा उडाला आहे.या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची असतानाही त्याकडे मुख्याधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.असे निवेदनात म्हटले आहे.
          शहरात गेल्या काही दिवसांत परप्रांतीय व परजिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येने आले आहेत.या मजुरांचे वास्तव्य शहरातील सार्वजनिक ठिकाणी आहे.शहरवासीयांबरोबरच परप्रांतीय,परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन होत नाही.त्यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका वाढला आहे.नगर पंचायतीने या बाबींची गंभीर दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी अन्यथा पारनेर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष वसिम राजे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

  कारवाईची मोहीम अधिक तीव्र करणार.-डॉ.सुनीता कुमावत.
       शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर,व्यावसायीकांवर कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल.परप्रांतीय,परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांचा शोध घेऊन त्यांना सूचना दिल्या जातील.नागरिकांनी,व्यवसायीकांनी स्वत: काळजी घ्यावी.कारवाईची वेळ येऊ देऊ नये.
-----------
डॉ.सुनीता कुमावत, मुख्याधिकारी नगरपंचायत, पारनेर.