Breaking News

सच्चा शिवसैनिकाला मिळाला न्याय कलविदंर सिंग डडीयाल शहरप्रमुख

सच्चा शिवसैनिकाला मिळाला न्याय कलविदंर  सिंग डडीयाल शहरप्रमुख


करंजी प्रतिनिधी-
    सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेकडे पहिले जाते. या संघटनेचा प्रत्येक सदस्य शिवसैनिक म्हणून इमानेइतबारे पक्षाचं काम करीत असून आजपर्यंत प्रत्येक शिवसैनिकाला त्याच्या प्रमाणिकपणाच फळ पक्षाने दिले असून कोपरगाव शहरातील कलविदंर सिंग डडीयाल यांना देखील त्यांनी केलेल्या प्रमाणिकपणाच फळ म्हणून कोपरगाव शहराच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
    प्रामाणिक शिवसैनिकावर पक्ष श्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासामुळे प्रत्येक शिवसैनिकांमध्ये कलविदंर सिंग डडीयाल यांच्या निवडीमुळे नवचैतन्य पसरले आहे.
 कोपरगाव शहरातील निवारा परिसरात साई समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सामाजिक कार्याला सुरुवात करणारे कलविदंर सिंग डडीयाल शिवसेनेशी जोडले जाऊन शिवसैनिक झाले. स्व. शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्ववादी विचाराने प्रभावित होऊन शिवसेनेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
आपल्या राजकीय जीवनात त्यांनी स्वर्गीय पुरब कुदळे यांच्या त्यांनी कडुन राजकीय धडे घेतले. चोवीस तास जनसेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या शिवसैनिकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना कोपरगाव शिवसेना उपाध्यक्ष पद देखील भूषविले आहे. दहीहंडी, गणेश उत्सव असे सार्वजनिक  कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहत. लहान-थोरांशी प्रेमाने वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आपल्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक राजकारण विरहित मित्र त्यांनी जोडत हाकेला धावणारा मित्र अशी आपली वेगळी कलविदंर सिंग डडीयाल यांनी निर्माण केली आहे.त्यांना भरत मोरे, असलम शेख , दीनार कुदळे, अनिरुध्द काळे, विरेन बोरावके यांनी मोलाची साथ देऊन व वेळोवेळी मार्गदर्शन करून महत्वाचे राजकीय सल्ले वेळोवेळी दिले असून या मार्गदर्शनातून ते आपली राजकीय कारकीर्द पुढे चालवीत आहे.आज त्यांची कोपरगाव शहर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे, पद्माकांतजी कुदळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र  झावरे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या निवडीमुळे स्व. काका शेखो .पुरब कुदळे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून कलविदंर सिंग डडीयाल यांच्या सारख्या प्रामाणिक शिवसैनिकाला दिलेल्या जबाबदारीमुळे शिवसेना हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.