Breaking News

वीज कंत्राट कामगारांची शासनाकडे इच्छामरणाची मागणी !

वीज कंत्राट कामगारांची शासनाकडे इच्छामरणाची मागणी

करंजी प्रतिनिधी-
   महावितरण कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदाच्या जागेवर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी वीज कामगारांना न्याय मिळावा भरती प्रक्रिया राबवून अनुभवी कंत्राटी कामगारांना त्यात सामावून घेत भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेकरिता दहावी च्या मार्कचा आधार न घेता आय टि आय च्या गुणांच्या आधारे मेरिट नुसार भरती करावी.तसेच कोरोना च्या काळात कर्तव्य बजावताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करत सर्व कंत्राटी कामगारांना विमा संरक्षण द्यावे अशा एक ना अनेक मागण्या पूर्ण कराव्या अथवा आहमला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे करत दि ७ सप्टेंबर पासून राज्यातील वीज कंत्राटी कामगार कृती समितीच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकारी तहसिल कार्यालयासमोर दररोज बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
        या मागणीसाठी राज्यभरातील महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ,तांत्रिक अँप्रेंटीस कंत्राटी कामगार संघ व महाराष्ट्र ब्राह्मश्रोत वीज कंत्राटी कर्मचारी संघटना यांनी एकत्र येत वीज कंत्राटी कामगार कृती समितीची स्थापना करत कर्मचाऱ्याचा न्याय हक्कासाठी लढण्याचा निर्धार करत शासनाने आमच्या मागण्याचा लवकरात लवकर विचार करावा नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंती शासनाकडे केली आहे अन्यथा ७ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.