Breaking News

परतीच्या पावसाने पूर्व भागातील शेतकरी हवालदिल !

परतीच्या पावसाने पूर्व भागातील शेतकरी हवालदिल


करंजी प्रतिनिधी-
    कोरोना च्या महामारीने कोणत्याच पिकांना भाव मिळत नसल्याने पूर्णहता शेतकरी राजा त्रस्त झाला असतांना परतीच्या पावसाने त्यात अजून त्यात भर पाडली आहे.
       कोपरगाव तालुक्यातील करंजी, बोलकी, ओगदी,पढेगाव, दहेगाव या परिसरात काल रविवार पासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाणे हिरावून घेतला आहे.
  रविवारी संध्याकाळी सुमारे एक तास मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले यात उभा ऊस,मका बाजरी तर पूर्णपणे जमिनोदस्त झाली असून कांद्याची रोपे सोयाबीन हे तर शेतातून काढण्याच्या परिस्थितीतच राहिले नाही रविवारी झालेल्या पाऊस व सोसाट्याचा वाऱ्याने नुकसान भागाची पाहणी पंचनामा करण्यासाठी आज सोमवार सकाळ पासून शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली गावोगावी तलाठी कृषी अधिकारी यांचे पथके नेमून पंचनामे देखील सुरू केले परंतु निसर्गाने परत आपली वक्र दृष्टी आज सोमवारी परत एकदा पूर्व भागातील याच गावी वळून कालच्या पावसातून कशी बशी काही अंशी वाचलेली पिके आज झालेल्या पाऊस वाऱ्याने जमिनोदस्त करून टाकली आहे त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झाला असून डोळ्या देखत जीवापाड जपलेल्या पिकांचा नायनाट झाल्याने प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत आहे.
    सामान्य शेतकऱ्यांनकडून सरकारी यंत्रणेकडे आता एकच अपेक्षा आहे की पंचनामे लवकरात लवकर करून वेळीच मदत करा नुसते कागदी घोडे नाचवत बसू नका आधीच शेतकरी कोरोनाने बेजार झाला असून तुह्मी कागदपत्राच्या कचाट्यात अडकू नका.