Breaking News

करंजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी !

करंजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आधुनिक शिक्षणाचे भगीरथ डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 133 वी जयंती कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय ,करंजी  येथे  सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी चे सदस्य कारभारी  आगवण यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यांच्या समवेत स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य डॉ. सूनील देसाई, साडूंभाई पठाण ,विद्यालयाचे मुख्याध्यापक  दिनकर माळी , सर्वश्री उपशिक्षक चौधरी बी.बी., चव्हाण एस.डी., जगताप एल.पी.,सांगळे जी.डी.,वसावे व्ही.आर.,डांगे एस.एस.,सरोदे ए.व्ही.,डोखे जी.एस. व सौ.अनाप ए.एम. उपस्थित होते.