Breaking News

गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन !

 अनुराधा पौडवाल पर टूटा दुखों का पहाड़, पति के बाद अब नहीं रहा बेटा; 35 की  उम्र में हुआ निधन | Bollywood Singer Anuradha Paudwal Son Aditya Paudwal  Passes Away KPG

मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन आज सकाळी झाले आहे. आदित्य ३५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य हा अरुण व अनुराधा यांचा मुलगा होता. शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती.

मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी आदित्यची प्राणज्योत मालवली. करोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचे पालन करत मुंबईत आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनुराधा पौडवाल यांचे पती अरुणसुद्धा संगीतकार होते. नव्वदच्या दशकात अनुराधा पौडवाल करिअरच्या शिखरावर होत्या. त्यावेळी त्यांचे पती अरुण यांचे निधन झाले.