Breaking News

कोपरगावातील डॉक्टर्स रविवारी ओपीडी सुरू ठेवणार !

कोपरगावातील डॉक्टर्स रविवारी ओपीडी सुरू ठेवणार
( कोपरगाव शिवसेनेच्या मागणीला यश )


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे व या संकटात भारतातील डॉक्टर्सने आपला जीव धोक्यात घालून अनेक लोकांचे प्राण वाचवले. परंतु काही डॉक्टर्स कोरोनाच्या भीतीने आपली ओपीडी बंद ठेवत आहेत. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना उपचार मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच रविवारी अनेक हॉस्पिटल बंद असतात त्यामुळे लहान मुलांना व ज्येष्ठ मंडळींना उपचार घेण्यास शहरात विविध ठिकाणी फिरावे लागते तरी त्यांना उपचार मिळत नाही. म्हणून कोपरगाव शिवसेनेकडून उत्तरनगर जिल्हाप्रमुख .राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयुर जोर्वेकर यांना निवेदन देण्यात आले की, रविवारी ओपीडी सुरू ठेवण्यास आपण कोपरगावातील डॉक्टर्सच्या टीमला आवाहन करावे व प्रत्यक्ष उपचार नसेल देता येत तर किमान आपण फोन द्वारे औषधे सुचवावे. कोपरगाव शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.मयुर जोर्वेकर यांनी आश्वासन दिले की, मी या विषयावर कोपरगावातील डॉक्टरांशी संपर्क साधला व सर्व डॉक्टर्सनी रविवारी ओपीडी सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली तसेच फोन द्वारे इमरजेन्सी कन्सल्टन्सी घेण्यासाठी त्यांनी कोपरगावातील डॉक्टरांची यादीही दिली. यावेळी एसटी कामगार सेना प्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, युवा नेते विक्रांत झावरे,वाहतूकसेना तालुका प्रमुख इरफान शेख,गगन हाडा,शहर संघटक बाळासाहेब साळुंके, विशाल झावरे,विभागप्रमुख विकास शर्मा,वासिम शेख, समीर पठाण, अक्षय वाकचौरे, अक्षय नन्नवरे, आकाश कानडे, वाल्मिक चिने,रितेश राऊत आदी शिवसैनिक उपस्थित होते