Breaking News

कोरोना च्या महामारीत शिंगणापूरच्या डॉक्टराचे माणुसकीचे दर्शन !

कोरोना च्या महामारीत शिंगणापूरच्या डॉक्टराचे माणुसकीचे दर्शन
---–----------
आई च्या आठविणीना उजाळा
---------------
१५ वर्षांपासून अनोखा उपक्रम


करंजी प्रतिनिधी-
राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना संख्येच्या वाढीने पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोपरगाव तालुक्याने देखील कोरोना रुग्णाच्या संख्येत १६०० चा आकडा पार करत २९ रुग्णांनी प्राण देखील गमावले आहे.
 या मुळे राज्यभरासह तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पणे अहोरात्र रुग्णाची सेवा करत आहे. यातच तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ विजय काळे यांनी आपल्या आई च्या १५ व्या वर्षश्राद्ध निम्मित बुधवार दि २३ सप्टेंबर रोजी दिवस भर आपल्या शिंगणापूर येथील श्रद्धा क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी करत माणुसकीचे एक अनोखे उदाहरण समाजापुढे मांडले आहे.

   डॉ काळे फॅमिली फिजिशियन आणि बालचिकित्सक असून ते  गेल्या २० वर्षापासून  शिंगणापूर येथे श्रद्धा क्लीनिक या  हॉस्पिटल द्वारे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करत असतात. डॉ काळे यांच्या मातोश्री कालकथित छबुबाई दादा काळे यांचे निधन २३/९/२००५ रोजी झाले. कै छबुबाई यांनी काबाड कष्ट करत आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांचा स्मुर्ती दिनी दरवर्षी डॉ काळे हे आई चा वर्षश्राद्ध चा कार्यक्रम न करता घरगुती पध्दतीने आई च्या फोटो ची पूजा करत आईचे ऋण म्हणून  आपल्या श्रध्दा क्लीनिक मध्येदिवसभर येणाऱ्या पेंशट ची मोफत तपासणी करतात २३ सप्टेंबर रोजी डॉ काळे यांनी सुमारे ४५ ते ५० पेशंट ची मोफत तपासणी करत एक अनोखे माणुसकीचे उदाहरण समाजापुढे घडवून आणले आहे. गेल्या १५ वर्षापासून ते आपल्या आई च्या आठविणीना उजाळा देण्यासाठी स्मुर्ती दिनी ते आपल्या पेंशट ची मोफत तपासणी करत योग्य ते मार्गदर्शन करत असतात. तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर देखील न घाबरता  डॉ नी आपला मोफत उपचाराचा उपक्रम बाराव्या वर्षी देखील नियमित सुरू ठेवल्याने तपासणी करून घेतलेल्या पेशंट ने आभार व्यक्त केले आहे. डॉ काळे हे शिंगणापूर सोबतच आसपासच्या गावात देखील परिचित आहे.