Breaking News

राहात्यात मस्करी वरुन दोन गटात हाणामारी !

राहात्यात मस्करी वरुन दोन गटात हाणामारी !


राहाता/प्रतिनिधी :
       राहाता शहरात मस्करीच्या कारणा वरुन दोन गटात तुंबाळ हानामारी झाल्याने. एका गटाने जिवे मारण्याची फिर्याद दाखल केली तर तर दुस-या गटाने अनुसुचित जाती व जमाती प्रतिबंध कायद्या नुसार परस्परा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या फिर्यादीत ब्रम्हा दत्तप्रसाद शिंदे रा. नवनाथनगर राहाता  याने  राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे कि   तुषार भोसले याला मस्करी करण्याचा राग आल्याने शनिवारी सायंकाळी ७ वाजता आरोपी योगेश वाघमारे, संदीप काकडे, सोन्या जाधव, अधय पगारे, रोहीत पगारे, अकाश गायकवाड, शुभम वाघमारे व इतर दोन. जणा  सह   .फिर्यादी ब्रम्हा. शिंदे   याला चाकू, कोयता, दगड याने मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न  केल्याने राहाता पोलिसांनी  वरील आरोपी. विरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला ़़असून या बाबत पुढील तपास  पोलिस निरीक्षक सुभाष भोये हे करीत आहे. 
दुसऱ्या फियाऀदीत रिना शामराव काकडे २५ रा. नवनाथ नगर हिने  दुसरी  फिर्याद. दिली असून तिने फिर्यादीत म्हटले आहे कि की मी आणि माझी हिराबाई काकडे हे शनिवारी संध्याकाळी  घरी असताना आरोपी ब्रम्हा शिंदे, भुषन लुटे, शिवाजी लुटे, सोमनाथ लुटे, भैय्या सोमनाथ लुटे, अविनाश शिवाजी लुटे यानी हातात लाकडी दांडके गज घेऊन  आमच्या घरात दाखल होत तुषार भोसले कुठे आहे या प्रकारची विचारणा करीत जातीवाचक शिवीगाळ करीत मारहान करून लज्जा उत्पन्न होईल या प्रकारचे कृत्य केले. फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची पोत व मोबाईल गहाळ केला फिर्यादी वरुन   राहाता पोलिसानी वरील आरोपी विरोधात  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार कायद्या नुसार गुन्हा दाखल केला असून  या बाबत पुढील तपास. उप. विभागिय अधिकारी. सोमनाथ वाकचौरे हे करीत आहे