Breaking News

वीरभद्र मंदिरातील चोरी प्रकरणी मुस्लिम बांधवाचे निवेदन !

वीरभद्र मंदिरातील चोरी प्रकरणी मुस्लिम बांधवाचे निवेदनशिर्डी प्रतिनिधी :
                 राहाता येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरातील दागिने चोरी प्रकरणी जलद तपास लावावा अज्ञात चोरांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा राहता व परिसरातील मुस्लिम समाज बांधवाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राहत्यातील मुस्लिम बांधवांनी  निवेदन शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना देले.
                या निवेदनात पुढे म्हटले आहे की राहाता येथील ग्रामदैवत व सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध वीरभद्र महाराज मंदिर येथे सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चांदीचा मुकुट व चांदीचे कासव व इतर दागिने
चोरून नेले असून हे चोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असतानाही संबंधिताना अजून तपास लागलेला नाही, या चोरीचा तपास त्वरित लावून संबंधिताना वर  कायदेशीर कारवाई व्हावी, असा राहता तालुक्यातील सर्व
मुस्लिम बांधवांच्या मनातील पण आहे.मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने अन्वर हुसेन शेख ,इलियास
आयुब शहा, पत्रकार मुस्ताक बुरहाण शहा, अन्वर अमीर शेख, समीर रशीद शेख, असहरअन्वर शेख, सुलेमान गणी शेख, शकील ईमानदार,नसीर इमानदार, ईफ्तीहार शेख ,सलीम सय्यद, रफिक शेख,मुन्ना रफिक शहा आदींनी एका निवेदनाद्वारे केलीआहे, हे निवेदन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यासह अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार हसन मुश्रीफ तसेच गृहमंत्री आमदार देशमुख त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस अधीक्षक अहमदनगर ,तहसीलदार राहता , पोलीसनिरीक्षक राहता पोलीस स्टेशन,आदींनी पाठविण्यात आले आहे,