Breaking News

पाथर्डीत कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न !पाथर्डीत कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न 


पाथर्डी/प्रतिनिधी :
       पाथर्डीच्या तहसील कार्यालयामध्ये काल श्री जगदंबा सोशल फाउंडेशन पाथर्डी च्या वतीने कोविड कार्यकालात सामाजिक जाणिवेतून अनेक व्यक्ती व संघटना यांच्या कडून जे सामाजिक कार्य केले आहे अशा सर्व व्यक्तींचा व संघटनेचा प्रातिनिधिक स्वरूपात  कोविड-योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे  अध्यक्ष स्थानी उपविभागीय अधिकारी माननीय देवदत्त केकान होते.
 पाथर्डी चे तहसीलदार श्री नामदेव पाटिल व देवदत्त केकाण यांच्या शुभ हस्ते सर्व कोविड योद्ध्या चा सन्मान करण्यात आला.
 आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय उपविभागीय अधिकारी श्री देवदत्त केकाण म्हणाले की, श्री जगदंबा सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून कोरोना चे संकट अद्याप संपलेले नाही परंतु अशा कार्यक्रमांमुळे कोरोना संकटात लढण्याची मानसिकता व बळ सर्वसामान्यांमध्ये निर्माण होते. यावेळी पाथर्डी चे तहसीलदार श्री नाम नामदेव पाटील यांचेही भाषण झाले. श्री.पाटिल यानी सर्व व्यक्ती व संघटना  यांच्या कामाचे कौतुक केले व प्रशासनाच्या वतीने  आभार मानुण  या सर्वांचा गौरव आपल्या भाषनात केला.
     या सन्मान सोहळ्यामध्ये प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, पाथर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर ,कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद ,विभाग प्रमुख सोमनाथ गर्जे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान दराडे ,कोविड सेंटर प्रमुख डॉक्टर महेंद्र बांगर, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष शेठ चोरडिया, चिंचपुर पांगुळ चे सरपंच धनंजय बडे,शेकटे  गावचे सरपंच बाळासाहेब घुले पोलीस कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण कामगार तलाठी हरिभाऊ सानप, पाथर्डी तालुका शिवसेना अध्यक्ष अंकुश चितळे ,सामाजिक कार्यकर्ते रोहित पुंड, जगदंब युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष adv  प्रतीक खेडकर, व्यापारी सोनू सेठ गूगळे , पुरुषोत्तम भैया इजारे ,जैन संघटनेचे राज्य सचिवअनिल खाटेर,सुवर्णयुग तरुण मंडळाचे अभय गांधी व त्यांचे सर्व सहकारी, सराफ असोसिएशन चेबाळासाहेब जिरेसाळ,आधार फाऊंडेशन चे मुकुंद लोहोया,स्फुर्तिदयिनी संघटनेच्या मनिषा ताई घुले, सुनीताताई उदबत्ते,डॉक्टर श्रिधर देशमुख, व सी न्यूज़ चे अमोल कांकरिया, पाथर्डी  टाईम्स  चे राजेंद्र भंडारी, अभिजीत खंडागळे, या सर्वांचा फाउंडेशनच्यावतीने गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
    या कार्यक्रमाचे प्रास्तविक फाउंडेशनचे प्रमुख कार्यवाह ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी मंत्री यांनी केले. तर आभार अध्यक्ष डॉ. संजय उदमले यांनी मानले. सूत्रसंचालन श्री शिवाजी मरकड सर यांनी केले.