Breaking News

कोहकडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई !

कोहकडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई!
---------
पोलिस कारवाईत पाच हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दारूसह सहित्याची लावली विल्हेवाट.
----------


पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यातील कोहकडी गावच्या शिवारा मध्ये हातभट्टी दारू तयार करून विक्री करत असल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली त्यामध्ये 3750 रुपयाची दारू व 1500 रुपयाचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपी पोलिसांना पाहून पसार झाला.
     पारनेर तालुक्यातील कोहकडी गावाच्या शिवारामध्ये हातभट्टी दारू तयार करून विक्री केली जाते या बाबतची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गुजर पोलीस कॉन्स्टेबल पाचारणे तोडमल यासह दोन पंच निघोज दूरक्षेत्र येथे नोंद करून 6:10 वा चे सुमारास जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच  आरोपी विजय गव्हाणे हा तेथून पळून गेला त्या पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता विजय गव्हाणे यांचे राहते घरा घरासमोर पडक्या रूमच्या आडोशाला अंदाजे 3750 रु किमतीचे निळ्या रंगाचे ड्रममध्ये सुमारे दीडशे लिटर हातभट्टी दारू बनविण्याचे कच्चे रसायन व 1500 रु किमतीचे साहित्य मिळून आले त्याचा पोलीसां समक्ष व पंचांसमक्ष जागीच नाश केला आहे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.