Breaking News

सामाईक बोरचे पाणी घेण्याच्या वादातून जीवे मारण्याची धमकी.

सामाईक बोरचे पाणी घेण्याच्या वादातून जीवे मारण्याची धमकी.


  नेवासा तालुका प्रतिनिधी :
    नेवासा तालुक्यातील निभारी येथील सामाईक बोरचे पाणी घेण्याच्या वादातून फिर्यादी रतन बाजीराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे कि,मी रतन बाजीराव जाधव (वय ५२) धंदा शेती रा.निंभारी ता नेवासा समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन फिर्याद देतो कि मी वरील ठिकाणी पत्नी मंदाबाई ,सून कोमल ,मुलगा सचिन,नातू युवराज असे एकत्रिक कुंटुंबात राहतो ,आम्ही शेती करून कुटुंबाची उपजीविका चालवितो.दि.३१/८/२० रोजी दुपारी २.३० चे सुमारास मी माझे शेत गट नं .९४/१ मध्ये मी माझी पत्नी मंदाबाई असे शेती मशागत करत असताना ,त्यावेळी शेताचे बांधावर राजू बाजीराव जाधव ईघनती बाजीराव जाधव दोघे रा.हल्ली तळेगाव दाभाडे ता.वडगाव मावळ जि.पुणे मूळ रा.निंभारी ता नेवासा हे आले व मला म्हणाले कि आपले सामाईक बोअरचे पाणी तुम्हाला भेटणार नाही त्यावेळी मी त्यांना समजावून सांगत असताना राजू बाजीराव जाधव याने वाईट शिवीगाळ केली.ईघनती बाजीराव जाधव याने मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच तू बोअरचे पाणी घेतले तर बोअरचे नुकसान करू अशी धमकी दिली म्हणून माझी वरील राजू बाजीराव जाधव व ईघनती बाजीराव जाधव यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशनमध्ये कलम ५०६ ,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक देवकाते  करत आहेत.