Breaking News

अकोले तालुक्यात कोरोनाचे विघ्न हाटेना, आज नवीन १८ कोरोना पॉझिटिव्ह !!

अकोले तालुक्यात कोरोनाचे विघ्न हाटेना !
----------
आज नवीन १८ कोरोना पॉझिटिव्ह!


अकोले प्रतिनिधी :
    अकोले तालुक्यात आज बुधवारी नवीन १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून अकोले तालुक्यातील करोना रुग्णां ची संख्या आता सहाव्या शतकाकडे सुरू आहे.
    अहमदनगर येथील शासकीयप्रयोगशाळेतील अहवालात तालुक्यातील ११ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला  यामध्ये शहरातील देवठाण रोड वरील ४१ वर्षीय पुरूष,धामणगाव आवारी येथील ३७ वर्षीय महीला,गर्दणीतील ५८ वर्षीय महीला, ३२ वर्षीय महीला,कुंभेफळ येथील ३९ वर्षीय पुरूष,३१ वर्षीय महीला,५२ वर्षीय महीला,५३ वर्षीय महिला, २१ वर्षीय तरुण,कळस येथील ४८ वर्षीय पुरूष,ब्राम्हणवाडा येथील ६८ वर्षीय पुरुष अशा ११ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.तर तालुक्यात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्येअकोले शहरातील कारखानारोड वरील ३१ वर्षीय महीला,ब्राम्हणवाडा येथील ६० वर्षीय महीला,२३ वर्षीय महीला,व ०९ महिन्याचा लहान मुलगा अशी ०४ व्यक्ती पॅाझिटीव्ह आली तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात धुमाळवाडी येथील ६२ वर्षीय पुरूष, कळस येथील ३८ वर्षीय पुरूष, अकोले शहरातील  ५८ वर्षीय पुरूष अशा तिन व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने तालुक्यातील को रोना रुग्ण संख्या ५७५ अली झाली असून सहाव्या शतकाकडे वाटचाल सुरू आहे.
    अकोले तालुक्यात कोरोनाचे  विघ्न कमी होण्याचे नाव घेत नाही कोरोना चे विसर्जन करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी  त्यात प्रशासनाला यश येत नाही उलट रूग्ण  संख्या वाढतच आहे.
 ---------