Breaking News

कोविड रुग्णालयाची कल्याण-डोंबिवलीत तोडफोडकल्याण । कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. डॉक्टर आणि नर्स तसेच संपुर्ण आरोग्य यंत्रणा आपल्या परीने काम करीत आहे. तरी देखील काही लोकं हे विनाकारण त्यांचा राग आरोग्य व्यवस्थेवर काढत आहेत. असाच एक प्रकार कल्याणच्या खडकपाडा येथील आयुष्य खाजगी कोविड रुग्णालयात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी रुग्णालयासमोरून जातांना एक व्यक्ती चक्कर येऊन खाली पडला. आयुष्य रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने त्या व्यक्तीला उचलून व्हिल चेअरवर बसवले.

त्या व्यक्तीला अन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा. कारण हे रुग्णालय कोविड रुग्णालय असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर राधानगरी सोसायटीतील प्रतिक आंबेकर, प्रितेश आंबेकर, प्रकाश आंबेकर अन्य आठ ते दहा जण रुग्णालयात आले. रुग्णाला का दाखल करुन घेतले नाही असा सवाल उपस्थित करत, रुग्णालयात येणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरच्या गाडी चालकास मारहाण केली. तसेच डॉक्टर आणि नर्सला शिवीगाळ करून रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कल्याण आयएमए या डॉक्टर संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त करीत तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.