Breaking News

आपले कुटुंब सुरक्षित राहिले तर आपले गाव सुरक्षित राहील माजी - सभापती दीपक पवार !

आपले कुटुंब सुरक्षित राहिले तर आपले गाव सुरक्षित राहील माजी- सभापती दीपक पवार
-------------
सुपा येथे माझे कुटुंब माझे जबाबदारी या आधारे राबवण्यात आली मोहीम


पारनेर प्रतिनिधी -
      पारनेर तालुक्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात आहे त्याआधारे सुपा येथे माजी पंचायत समिती सभापती दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
      राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे त्यामुळे मी चा शुभारंभ तालुक्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला त्यांच्या आदेशानुसार ही मोहीम तालुक्यानुसार राबवली जात आहे त्यादृष्टीने सुपा येथे या मोहिमे अंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
      यावेळी माजी सभापती दीपक पवार यांनी नागरिकांना आरोग्याविषयी माहिती दिली तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला आपले कुटुंब सुरक्षित राहिले तर आपले गाव सुरक्षित राहील त्याचबरोबर आपला तालुका यामुळे कोरोना मुक्त होईल कोणत्याही प्रकारचे कोरोना सदृश  लक्षण असेल तर नागरिकांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन दीपक पवार यांनी यावेळी केले.


       यावेळी राहुल पाटील शिंदे यांनी नागरिकांना कोणतेही दुखणे आपल्या अंगावर काढू नका त्वरित चाचणी करून घ्या कोरोनाची लागण जर झाल्याचे निष्पन्न झाले तर घाबरून जाऊ नका वेळीच त्याचे निदान झाले तर त्यावर तातडीने उपचार केल्याने रुग्ण बरा होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
       यावेळी  राहुल पाटील शिंदे शंकर नगरे दत्ता शेठ पवार सुकाशेठ पवार सागर भाऊ मैड पप्पू पवार कैलास दहिवाळ नागवडे भाऊसाहेब आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका यावेळी उपस्थित होते.