Breaking News

ग्रामस्थाची एकजुट असल्यास ग्रामविकासाला जलद चालना मिळते -आमदार निलेश लंके

ग्रामस्थाची एकजुट असल्यास ग्रामविकासाला जलद चालना मिळते -आमदार निलेश लंके
-------------   
 बाबुडी येथे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपुजन व लोकार्पण
-------------
नगर पारनेर मतदार संघाच्या एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही- आमदार निलेश लंके
--------------
 ग्रामपंचायत सदस्य प्रविण दिवटे यांचा आमदाराच्या हस्ते गुणगौरव 


सुपा प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील बाबुडी यंथे दिनांक 19 /9 /2020 रोजी 
बाबुर्डी ग्रामपंचायतीच्या मार्फत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पारनेर तालुक्याचे आमदार माननीय श्री निलेशजी लंकेसाहेब यांच्या शुभहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. 
      यावेळी आमदार साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायत बस स्थानक क्रमांक एक व दोन, महिला लसीकरण केंद्र ,ध्वज स्टॅन्ड ,रोकडिया मंदिरा समोर पेविंग ब्लॉक व ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण सोहळा पार पडला त्या वेळी प्राथमिक स्वरूपात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वह्या व कंपास चे वाटप व उपस्थित मान्यवरांना ग्रामपंचायतीच्या वतीने मेडिक्लोर चे वाटप करण्यात आले तसेच माळवाडी व गावठाण मधील ग्रामस्थांना नळ पाणीपुरवठा पाईपलाईन योजना व गावठाण अंतर्गत बंदिस्त गटार लाईन चे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी पंचवीस पंधरा अंतर्गत रोकडिया मंदिरासमोर सभामंडपाचे काम व पालखी मार्ग रस्ता काँक्रिटीकरण या दोनही कामांचे भूमिपुजन करण्यात आले महिला लसीकरण केद्राचे उदघाटन वैदयकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी अश्विनीताई गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले व माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत मा सरपंच आशाताई दिवटे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण दिवटे, दादा गवळी, मनिषा जगताप, नंदाबाई गाडगे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दिवटे, ग्रामविकास अधिकारी संदीप बळीत, ठेकेदार साजिक शेख व बबलु मापारी ग्रामस्थ भाऊसाहेब दिवटे, ज्ञानदेव जगताप, प्रमोद दिवटे, पोपट दिवटे, अशोक दिवटे, सोपान गारकर संदिप ठुबे, संतोष मेजर सतोष पिसे, किसन ठुबे, प्रकाश दिवटे आदी उपस्थीत होते कार्या क्रमाचे 
सूत्रसंचालन ज्ञानदेव जगताप यानी केले सुरेश दिवटे यांनी आभार मानले.