Breaking News

पत्रकार मृत्यूप्रकरणी आत्मा मालिक हॉस्पिटलची चौकशी करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी !

पत्रकार मृत्यूप्रकरणी आत्मा मालिक हॉस्पिटलची चौकशी करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     पत्रकार पांडुरंग रायकर कोरोनावर उपचार घेण्यासाठी ज्या आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये गेले त्यावेळी त्यांच्याकडे किती पैशांची मागणी करण्यात आली? तसेच त्यांना किती तास हॉस्पिटल प्रशासनाने उपचाराअभावी ताटकळत ठेवले? त्यातील कोणते अधिकारी अरेरावीची भाषा करत होते? तसेच महात्मा फुले जन आरोग्य सुविधांची चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे तहसीलदार योगेश चन्द्रे यांना निवेदन देण्यात आले आहे, दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड,मनसे अपंगसेना जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल तालुका मार्गदर्शक सुनील फंड मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रोहित एरंडे ,शंकर होडे यांच्या सह्या आहे.