Breaking News

८ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ; एका व्यक्तीचा मृत्यू ; तालुक्यात आढळले ३१

८ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ; एका व्यक्तीचा मृत्यू ; तालुक्यात आढळले ३१


कर्जत प्रतिनिधी :
कर्जत पोलीस स्टेशनचे आठ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी कर्जतच्या कस्टडीतील २८ आरोपी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. आज तालुक्यात एकूण ३१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी ही माहिती दिली.

1. कर्जत- 5
2. मिरजगाव- 5
3. कुळधरण - 4
4. राशीन - 2
5. गुरवपिंपरी- 1
6. बेनवडी- 1
7. जळकेवाडी- 1
8. चापडगाव- 2
9. हिंगणी- 1
11. शेगुड- 1
12. पोलीस स्टेशन कर्जत येथील पोलीस कर्मचारी- 7
13. राशीन पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी- 1

शेगुड येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.