Breaking News

पारनेर तालुक्यांमध्ये आज दिवसभरात २१ अहवाल पॉझिटिव्ह, एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८५४ वर !

पारनेर तालुक्यांमध्ये आज दिवसभरात २१ अहवाल पॉझिटिव्ह
---------
पारनेर तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८५४ वर
--------
पारनेर शहरामध्ये वाढत आहे कोरोना चा संसर्ग


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यात आज दि. ३ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार २१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये आळकुटी २ गोरेगाव १ सुपा १ कोहकडी २ राळेगण-सिद्धी १ हंगे १ वासुंदे १ देवीभोयरे १ वडगाव सावताळ १ भाळवणी ६ पारनेर २ निघोज २ अश्या एकूण २१ जणांचा समावेश आहे.
पारनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तालुक्यात एकूण आत्तापर्यंत ८५४ रुग्णांना कोरोना ची बाधा झाली आहे त्यापैकी ६८० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे तर १५३ कोरोना बाधित रुग्ण सध्या उपचार घेत असून २१ व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील आज ज्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे ते रुग्ण रहात असलेल्या १०० मीटर चा परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.