Breaking News

काष्टी परिसरामध्ये "बेशिस्त" प्रवाशांवर पोलिस प्रशासनाची कारवाई !

काष्टी परिसरामध्ये "बेशिस्त" प्रवाशांवर पोलिस प्रशासनाची कारवाई


काष्टी/प्रतिनिधी :
काष्टी परिसरामध्ये बेशिस्त प्रवाशांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोरोना सारख्या महामारिने हाहाकार घातलेला असताना त्यांचं गांभीर्य प्रवाश्यांना नसल्याचं दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना मुळे मृत्यूच्या आकड्या मध्येही वाढ झालेली आहे. वेळोवेळी प्रशासन, समाजसेवक, डॉक्टर, आरोग्याची काळजी घेण्यासाठीचे सूचना करत आहेत. परंतु सूचनांचे पालन होत नसल्याने चिंता वाढत आहे.


   सूचना करूनही प्रवासी विना मास्क प्रवास, गर्दी करत आहेत. यावर उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने स्वतः चे आरोग्य धोक्यात घालून मास्क न वापरणाऱ्यांवर दंड रुपी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. श्रीगोंदा पोलिस स्टेशन चे पोलिस कॉन्स्टेबल पी टी देवकाते, ए पी कोतकर व सहकारी कारवाई करत आहेत. या बेशिस्त प्रवाशांवर होणाऱ्या कारवाईचे शिस्तप्रिय नागरिकांकडून कौतुक होत आहे.