Breaking News

पारनेर तालुक्यात काल ३६ अहवाल पॉझिटिव्ह ५६ निगिटीव्ह !

पारनेर तालुक्यात काल ३६ अहवाल पॉझिटिव्ह ५६ निगिटीव्ह !
---------
तालुक्यातील वाढत असलेली रुग्ण संख्या चिंतेची बाब
----------
नागरिकांनी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये तहसीलदार ज्योती देवरे


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील दि. ६ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार ३६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालामध्ये गोरेगाव ६ पारनेर २ वडगाव सावताळ ४ कान्हूर पठार ७ देवीभोयरे २ आळकुटी १ सिद्धेश्वर वाडी १ भाळवणी १ लोणी हवेली १ धोत्रे १ शिरापूर २ निघोज १ पठारवाडी १ गुणोरे २ कळस १ कासारे १ पुणेवाडी १ टाकळी ढोकेश्वर १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तर तालुक्यातील ५६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे यामध्ये अस्तगाव १४ पारनेर शहर २३ कान्हूर पठार ३ जवळा १ पोखरी ५ निघोज २ लोणी हवेली १ पानोली १ गुणोरे १ राळेगण-सिद्धी ४ गोरेगाव १ या गावातील व्यक्तींचा निगेटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
पारनेर तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण ९५० च्या घरात गेली तालुक्यातील नागरिकांनी लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य तपासणी करून घ्यावी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये असे अहवान तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे.
पारनेर तालुक्यातील ज्या गावातील ज्या भागांमध्ये आज कोरोना रुग्ण सापडले आहेत तेथील रुग्ण राहत असलेला १०० मीटर चा परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.