Breaking News

बक्तरपूर मधील शेतकऱ्यांना फळपिकांच्या आधुनिक लागवडीचे प्रात्यकक्षित !

बक्तरपूर मधील शेतकऱ्यांना फळपिकांच्या आधुनिक लागवडीचे प्रात्यकक्षित


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव २०२०- २१ उपक्रमांतर्गत बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत गणेश दौलत जाधव यांनी   बक्तरपूर   गावातील शेतकऱ्यांना बागायती फळपिकांची आधुनिक लागवड याबद्दल प्रत्यक्षिताद्वारे महिती दिली..
फळपिकांची योग्य प्रकारे लागवड न केल्यास व योग्य प्रकारचं खत व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात घट कशा पध्दतीने येते   हे सविस्तर सांगत  विविध फळ पिकांचे कलम, शेती क्षेत्रातील अॕप्स , माती परीक्षण, बीजअंकुरण, जनावरांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, एकात्मिक तण व्यवस्थापन, पीकातील सूक्ष्म पोषक घटकांचे महत्व, याविषयी मार्गदर्शन केले.
            यावेळी  अनिल बोडखे,. पांडुरंग लहाणे,  भारत बोडखे, मंगेश जोशी, राजेंद्र जाधव आदी प्रगतशील शेतकरी उपस्थित होते तसेच या उपक्रमासाठी बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुलधर, डॉ. म्हस्के, प्रा. नरोटे, प्रा.साळुंके, प्रा. तायडे, प्रा.राठोड, यांचे मार्गदर्शन लाभते