Breaking News

महापुरुषांनी दिलेला विचार प्रेरणादायी - अॕङ .मनोज कडु !

महापुरुषांनी दिलेला विचार प्रेरणादायी - अॕङ .मनोज कडु


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
स्वातंत्र्य पूर्वकाळात व स्वातंत्र्या नंतर हि महापुरुषानी केलेले कार्य व दिलेला विचार प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन अॕङ. मनोज कडु यांनी केले.
राष्ट्रीय लहुजी सेना व दलित साहित्य संमेलन कमेटी यांच्या वतीने अण्णाभाऊं साठे जन्मशताब्दी वर्षा निमीत्त आयोजित व्याख्यानमालेचे दसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. अण्णाभाऊंनी संघर्षातून उतुंग शिखर गाठले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगतसिंग, राजगुरु,सावरकर,महात्मा गांधी,महात्मा फुले,इत्यादीनी देशहितासाठी समाजासाठी केलेला त्याग मोलाचा आहे असे ते म्हणाले, या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.बाळासाहेब नेटके यांनी केले तर आभार परशुराम साळवे यांनी केले यावेळी अॕङ  सुरेश मोकळ व दत्तु खेरनार आदि उपस्थित होते.