Breaking News

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात ४० अहवाल पॉझिटिव !

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात ४० अहवाल पॉझिटिव.
----------
रुग्ण संख्या वाढत असताना तालुक्यातील नागरिक मात्र बिंदास.
--------
बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन बाबत होत आहे दुर्लक्ष!


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे समूह संसर्ग झाला असण्याची शक्यता तालुक्यात वर्तवली जात आहे,तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ही १२०० जवळ पोहोचली आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पॉझिटिव अहवालामध्ये आळकुटी २ शिरापूर १ वडनेर हवेली ३ पारनेर शहर ६ सोबलेवाडी १ कान्हूर पठार २ हंगा २ लोणीमावळा २ राळेगण-सिद्धी १ वडझिरे १ तिखोल १ पिंपळगाव रोठा ४ रुई छत्रपती १ गांजीभोयरे २ पिंपरी जलसेन १ पुणेवाडी १ भाळवणी ५ सुपा २ पाबळ २ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह व यामध्ये समावेश आहे.
तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत,अनेक भागांमध्ये समूह संसर्ग झाला असताना देखील तेथील नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, याकडे देखील नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे नुकतेच शासनाने जाहीर केलेले माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत तालुक्यात तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे हे अनेक खेडेगावात जनजागृती करत आहेत.
तसेच तालुक्यांमध्ये ज्या गावामध्ये व शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत तेथील रुग्ण राहत असलेल्या १०० मीटर चा भाग हा काटेकोरपणे कंटेनमेंट झोन करणे गरजेचे असताना तेथील प्रशासनाकडून ते होताना दिसत नाही,अनेक कंटेनमेंट झोन असलेल्या भागातील नागरिक हे बिंदास सार्वजनिक ठिकाणी व कंपनी व व्यावसायिक या ठिकाणी वावरताना दिसत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांची भावना संतप्त आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.