Breaking News

सुजित झावरे यांच्यावर महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेची कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

सुजित झावरे यांच्यावर महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेची कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
--------------------
कर्तव्यात कसूर व महिला अधिकाऱ्यास अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे पारनेर पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची  मागणी
   ---------------------
तहसिलदारांचे बाबतीत मोठी निंदनिय घटना घडलेली असतांनाही तक्रार दाखल करुन घेण्यासाठी टाळाटाळ केली म्हणून महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक !
--------–--------------
याबाबत संघटनेने केली निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी !


पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर येथील महिला तहसिलदार ज्योती देवरे यांचेशी अश्लिल भाषेत संभाषण करुन विनयभंग केलेबाबत. तसेच शासकिय कामकाजात अडथळा निर्माण करून खंडणी मागणी केल्याप्रकरणी संबंधीतावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना महाराष्ट्र राज्य मुख्यालय नाशिक यांनी निवेदन दिले आहे.
      अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी श्रीमती ज्योती देवरे, तहसिलदार पारनेर जि.अहमदनगर यांना दि .१७. रोजी तहसिलदार यांचे दालनात येवून मोठया संख्येने कार्यकर्ते जमा करुन त्यांचे समोर व इतर कर्मचारी यांचे समोर जोराजोराने ओरडून, अश्लील भाषेत शिविगाळ करुन बेईज्जती केली व अनेक खोटे नाटे आरोप करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच यापूर्वी देखील श्रीमती देवरे हया कोविड आजाराच्या उपचारार्थ इस्पितळात दाखल असतांना सुद्धा रात्री अपरात्री त्यांना भ्रमणध्वनीव्दारे अश्लील शिविगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व श्रीमती देवरे यांच्याकडून दरमहा खंडणी देणेबाबत त्यांना वारंवार धमकविले. एका महिला तहसिलदारांबाबतीत अशा प्रकारे निंदणीय कृत्य करणा-याचा महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना तीव्र निषेध केला या घटनेमुळे श्रीमती देवरे, तहसिलदार पारनेर तसेच राज्यातील इतर सर्व महिला अधिका-यांचे मनोधैर्य खचले असून अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्यावर याबाबत दाखल गुन्हयानुसार तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
        तसेच सुजीत झावरे यांच्या आई सुप्रिया झावरे हया सद्यस्थितीत टाकळी येथील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांचेकडून श्रीमती ज्योती देवरे, तहसिलदार पारनेर यांचेवर खोटया तक्रारी करुन त्यांना अडचण निर्माण करण्याबाबत सुजित झावरे यांनी धमकावले आहे व त्यामाध्यमातून देखील श्रीमती देवरे यांच्या खोटया तक्रारी करून त्यांना त्रास देण्याची व त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सुजीत झावरे यांच्या आई श्रीमती सुप्रिया झावरे यांचे जिल्हा परिषद सदस्यपद तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी.
   या  घटना घडतेवेळी पारनेर येथील पोलीस निरिक्षक यांनी जिल्हयात कलम १४४ व ३७ (१) (३) चे निर्बंध लागू असतांना देखील तहसिल कार्यालयात येणा-या जमावास कुठलाही अटकाव न करता कार्यालयीन बैठक चालू असतांना देखील तहसिल कार्यालयात प्रवेश करु दिला. तसेच या घटनेनंतर तहसिलदार पारनेर हया तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या असता पोलीस निरिक्षक पारनेर पो.स्टे. यांनी तालुका कार्यकारी दंडाधिकारी असलेल्या एका महिला तहसिलदारांचे बाबतीत मोठी निंदनिय घटना घडलेली असतांनाही तक्रार दाखल करुन घेण्यासाठी टाळाटाळ केली, तक्रार दाखल करणेकामी तहसिलदारांना दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. 
       श्रीमती देवरे यांना चुकीची वागणूक दिली अखेरीस पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र यांनी पोलीस निरिक्षक,पारनेर यांना दुरध्वनीवर आदेशीत करून संबंधितांविरूध्द गुन्हा का दाखल करण्यात आला नाही याचा जाब विचारला. घटना घडल्यानंतर सुमारे ५ ते ६ तासांनी संबधिताविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलीस निरिक्षक,पारनेर यांनी त्यांचे कर्तव्यात कसूर केल्यामुळे व महिला कार्यकारी दंडाधिकाऱ्यास अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे त्यांचेवरही तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. पारनेर तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांचेशी अश्लिल व लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत संभाषण करुन विनयभंग करणे, खंडणी मागणी करणे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुजीत झावरे यांचेवर दाखल गुन्हयानुसार तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
        तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्या आई सुप्रिया झावरे यांचे जिल्हा परिषद सदस्यपद तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी व या संपूर्ण प्रकरणाचे अनुषंगाने पोलीस निरिक्षक, पारनेर यांनी त्यांचे कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचेवरही तात्काळ उचित ती प्रशासकीय कारवाई करण्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.