Breaking News

संजय राऊतांची फडणवीसांसोबत गुप्त भेट !मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची आज (26 सप्टेंबर) दुपारी गुप्त भेट झाली. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. याअगोदर बरोबर आठवड्याभरापूर्वी (18 सप्टेंबर) भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. दानवे-राऊत भेटीनंतर आज फडणवीस-राऊत भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे