Breaking News

कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा हजारी पार !

कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा हजारी पार


करंजी प्रतिनिधी-
   आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३३ बाधित तर  ६८ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच  खाजगी लॅब च्या अहवालानुसार १ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

जेऊर कुंभारी -०१
ब्राम्हणगाव -०१
 चांदेकसारे -०१
 चासनळी-०६
सुभद्रानगर-०१
लक्ष्मीनगर -०१
 अन्नाभाऊ साठे पुतळ्या जवळ -०१
खडकी -०८
साईसिटी -०१
 शिवाजी रोड-०१
तेली गल्ली-०५
अंबिकानगर-०१
काले मळा -०१
बेट -०१
 जैन मंदिर जवळ-०१
निवारा -०१
हनुमाननगर -०१
गजानननगर -०१असे आज ५ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३४ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १८ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी १७ संशयितांचे स्राव पाठवले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १००४  तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७८ झाली आहे.

आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या १८ झाली आहे.