Breaking News

सख्ख्या मुलानेच केला आईचा खून, संपत्तीत मुलीला समान वाटा देण्यावरुन वाद पेटला !

 


लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील मोदीनगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशात कायद्यानुसार मुलींनाही आई-वडिलांच्या संपत्तीत हिस्सा आहे. मात्र एका मुलाला आपल्या आईचा हा निर्णय आवडला नाही. मुलीला संपत्तीचा हिस्सा देत असल्याच्या रागात सख्खा मुलाने आपल्या आईला जीवे मारले. गोळी घालून तिची हत्या केली.

याप्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या निर्दयी मुलाला अटक केली आहे. या हत्येत आरोपीच्या मित्रानेही मदत केली असून त्याला अद्याप पकडण्यात आलेलं नाही. सध्या त्याचा तपास सुरू आहे. याप्रकारानंतर कुटुंबात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलं आहे.

वृद्ध महिलेची गोळी घालून केली हत्या

ही घटना शुक्रवारी सायंकाळी गोविंदपुरी भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेला आरोपी हरेंद्र आपली आई सावित्री (70 वर्षे) हिच्यासोबत संपत्तीच्या वाटपावरुन वाद सुरू होता, ज्यामुळे आई आणि मुलामध्ये वाद सुरू झाला. यानंतर नाराज झालेल्या हरेंद्रने आपल्या एका सहकाऱ्यासोबत वृद्ध आईची गोळी मारुन हत्या केली. जागीच महिलेचा मृत्यू झाला.


पोलिसांनी आरोपीला केली अटक

महिलाच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि मुलाला अटक केले. सांगितले जात आहे की, मृत्यू झालेल्या महिलेला दोन मुले आहे. हरेंद्र त्यागी आणि धर्मेंद्र त्यागी. दोघेही भाऊ एकाच घरात आपल्या आईसोबत राहतात. हरेंद्र व धर्मेंद्र यांच्याशिवाय त्यांची बहिण अनिताही हिचं लग्न झालं असून काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्री आपल्या मुलीला संपत्तीचं समान वाटप करू इच्छित होती. ज्यामुळे हरेंद्र नाराज झाला होता. शुक्रवारी सायंकाळी उशिरा हरेंद्र बंदूक घेऊ आला व त्याने आपल्या आईला खोलीत धक्का देत खाली पाडलं. आणि आईवर गोळी झाडली. गोळी घातल्यानंतर आरोपी गपचूप घराबाहेर येऊन उभा राहिला. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले व त्यांनी आरोपीला अटक केली.