Breaking News

देशातील बाधितांचा आकडा ६० लाखांच्या उंबरठ्यावर ! देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. म्हणूनच देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढता दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८८ हजार ६०० नवे रुग्ण आढळले असून १ हजार १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख ९२ हजार ५३३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ५०३ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

देशात सध्या ९ लाख ५६ हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे तसेच आतापर्यंत ४९ लाख ४१ हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली