Breaking News

महिलेवर बलात्कार प्रकरणी एकास अटक !

महिलेवर बलात्कार प्रकरणी एकास अटक


पारनेर प्रतिनिधी-
      पारनेर तालुक्यातील पळशी येथील 29 वर्षीय महिलेवर बलात्कार करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पारनेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रावसाहेब विनायक विधाटे वय 50 रा. महीसगाव आग्रेवाडी ता राहुरी जिल्हा अ.नगर आरोपी अटक आहे हा फिर्यादी महिलेच्या मुलीला सांभाळण्याची व लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेच्या संमतीशिवाय सन 2017 ते दि.14 जून 20 रोजी या कालावधीत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून पीडित महिले वर बलात्कार केला तसेच त्यास विरोध केला असता  लाथाबुक्क्यांनी मारहाण करायचा तसेच फिर्यादीने आरोपी यास मुलीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पैशाची मागणी केली असता त्याने महिलेस शिवीगाळ करून तुझा व माझा काही संबंध नाही तू तुझ्या घरी निघून जा माझ्या विरुद्ध कुठे तक्रार केली तर तुझ्या मुलीला व आईला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वा करत आहेत.