Breaking News

घोटण ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त !

घोटण ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त !


घोटण/प्रतिनिधी :
    राज्यातील 19 जिल्ह्यातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून 2020 दरम्यान समाप्त झाली आहे. तर 12 हजार 688 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीदरम्यान समाप्त होत आहे.
    कोरोना संकटामुळे या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचं कामकाज तात्पुरत्या स्वरूपात शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घोटण ग्रामपंचायतवर प्रशासकीय अधिकारी म्हणून पंचायत समिती शेवगाव येथील विस्तार अधिकारी श्री.इसरवाडे साहेब यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.आज त्यांनी पदभार स्वीकारल्याने याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी बोडखे व घोटण गावचे माजी सरपंच रमेश जगधने व सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.