Breaking News

माझा देश माझी जबाबदारी - -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या मोहिमेमध्ये लोकांना कोरोना संदर्भात जागृत केले पाहिजे

माझा देश माझी जबाबदारी - -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
या मोहिमेमध्ये लोकांना कोरोना संदर्भात जागृत केले पाहिजे
----------
आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी नागरिकांनी योग्यरीत्या पार पाडावी - सभापती गणेश शेळके
-----------
लक्षणे दिसत असतील तर त्वरित आरोग्य तपासणी करून घ्यावी - तहसीलदार ज्योती देवरे


पारनेर प्रतिनिधी-
 माझा देश माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी या आधारे लोकांना आता जागवले पाहिजे यासाठी थोडा वेळ लागेल पण कोरोना शी लढण्यासाठी घरोघरी जनजागृती महत्त्वाची आहे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मोहीम राज्यभर राबवण्याबाबत आदेश दिले आहेत त्यानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जाते आहे पारनेर तालुक्यात ही मोहीम योग्यरीत्या राबवली जात असून या मोहिमेअंतर्गत आज राळेगणसिद्धीत येथे तपासणी करण्यात आली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत राळेगणसिद्धी येथे आज तेथील ग्रामस्थांची आरोग्याची  तपासणी करण्यात आली यावेळी तहसीलदार ज्योती देवरे पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके उपस्थित होते यावेळी अण्णा हजारे यांनी या मोहिमेचे स्वागत केले या नुसार लोकांमध्ये जागृती करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


सभापती गणेश शेळके यांनी या संदर्भात राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांना माहिती दिली त्यानुसार नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची देखील जबाबदारी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले तालुक्यातील सर्वच गावामध्ये ही मोहीम राबवली जाणार असून ज्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे असतील त्यांनी त्वरित आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे यावेळी त्यांनी सांगितले.
या मोहिमेमध्ये प्रत्येक गावांमध्ये दररोज पन्नास कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे ज्या नागरिकांना काही लक्षणे असतील त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी या मोहिमेबाबत येथील नागरिकांना माहिती दिली तसेच ज्या नागरिकांना कोरोना बाबत काही लक्षणे दिसत असतील त्यांनी त्वरित समोर येऊन चाचणी करावी तसेच कोरोना ला आपल्याला आळा घालायचा असेल तर आपले कुटुंब आपली जबाबदारी याप्रमाणे कुटुंबातील सदस्यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांना भाग पाडावे त्यामुळे आपले कुटुंब कोरोना पासून मुक्त होऊ शकते व कुटुंब मुक्त झाले तर गाव मुक्त होईन गाव मुक्त झाले तर तालुका मुक्त होईल हेच आपले उद्दिष्ट आहे असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.