Breaking News

खरवंडी कासार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर !

खरवंडी कासार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर

खरवंडी कासार :
      ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे ग्रामपंचायत ढिसाळ कामामुळे खरवंडी कासार येथिल दोन व्यावसायिकांचे ७,७५००० रूपयाचे नुकसान झाले आहे सदरवृत्तअसे कि पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे बंदीस्त गटार वित्त आयोगातुन सुरू असून गटार चेंबर खोदकाम भराई अर्धवट असल्याने खरवंडी कासार येथिल व्यावसायिक अनिल मुसलीधर पवार , सतिष गणपत जगताप यांच्या दुकानात पावसाचे ,गटारीचे पाणी शिरून नुकसान झाले ग्रामपंचायत पदाधिकारी यांना वेळोवेळी कल्पना देऊन सदर कामाकडे डोळेझाक केली त्याचा त्रास खरवंडी ग्रामस्थांना झाला सदर नुकसानिचा पंचनामा ग्रामविकास अधिकारी अशोक दहिफळे तलाठी जालिंदर सांगळे आदी पंचकमीटीने केला आहे वित्त आयोगामधून बंदिस्त गटारीचे खरवंडी गावठाण अंर्तगत ग्रामपंचायतने बंदीस्थ गटारीचे गल्लोगल्ली काम केले ते अर्धवट अवस्थेत त्याचा त्रास ग्रामस्थांना झाला आहे तर तिन घरासाठी हजारो रूपयाचा वित्त आयोग निधी खर्च केला सदर खरवंडी कासार मधील संपूर्ण बंदीस्त गटार बांधकाम आराखडया प्रमाणे झाले नसून त्याची चौकशी व्हावी , नुकसान ग्रस्थांना न्याय मिळावा अशी मागणी शैलेंद्र जायभाये यांनी केली आहे.