Breaking News

गटविकास अधिकाऱ्यांना नर्सेस संघटनेचे निवेदन !

गटविकास अधिकाऱ्यांना नर्सेस संघटनेचे निवेदन !


करंजी प्रतिनिधी- 
   ग्रामीण भागातील कोरोनाच्या प्रादुर्भात आपला जीव हातावर घेऊन काम करनारी ग्रामीण आरोग्याचा पाया आसनारी परंतु शासन दरबारी दुर्लाक्षीत असणारी आजपंर्यंत कधीही संप आथवा आंदोलन न केलेली  असे महाराष्ट्रातील केडर म्हणजे ग्रामीण भागातील परिचारिका वर्षानुवर्ष फक्त काम आणि काम करणाऱ्यांना या भगिनींना जो मागेल त्यालाच देणारे शासनाने उपेक्षीतच ठेवले आहे. वारंवार तोंडी अथवा मागण्यांचे निवेदने देऊनही शासन दखल न घेतल्यामुळे ग्रामीण कोविड योद्धा या आंदोलनाचे रणाशिंग फुंकले आहे परंतु जागतिक महामारीचे गांभीर्य लक्षात घेता यांनी शासनाला ७ दिवसाच्या काळात कोणत्याही कामाची अडवणूक न करता काळ्या फिती लावून काम करणार व त्यानंतर जर शासनाने दखल घेतली नाही मागण्या मान्य केल्या नाहीतर आठव्या दिवसापासून कामबंद आंदोलन करणार असल्याचे समजते शासनाने ग्रामीण परिचारिकाच्या बाबतीत नेहमीच वेळ काढूपणा धोरण अवलंबविले परंतु आता यशाशी आल्यामुळे ग्रामीण परिचारिकांनी सर्व राज्य संघटनेने मार्फत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 
     अहमदनगर जिल्ह्यातील विस पचविस वर्ष सेवा देणाऱ्या भगिनींना  विविध लाभानं पासुन वंचित ठेवले, या साठी भगिनींना न्यायालयात धाव घेऊन न्यायलयाच्या आदेशानंतरही स्थायीत्वाच्या ऑडरसाठी केविल वाणी वाट पहावी लागत आहे, भगिनीनी  आर्थिक लाभाची कोडी केली जाते यासाठी प्रत्येक वेळी न्यायलयेच्या पाऱ्या झिझवाव्या लागत आहे, अशा अनेक समस्यांना वाचा फोडुन मागण्या  मार्गी लावण्यासाठी सर्व भगिनीनी संपात सहभाग आपला हाक्क शासनाकडे मागावा, अशा अनेक मागण्यांसाठी मंत्रालयापासुन जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी  जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांना सर्व तालुक्यातुन भगिनींचा आक्रोशरुपी निवेदन देण्यात आले आहे.
   कोपरगावचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे कोपरगाव येथिल  धंनवटे, गांगुर्डे ,तरवळे, पठाण, गायकवाड, यांनी निवेदन दिले.