Breaking News

कोपरगाव तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवक व प्रशासकाच्या हातात !

कोपरगाव तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवक व प्रशासकाच्या हातात !

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
      शासनाच्या अध्यादेशानुसार नैसर्गिक अपत्ती किंवा आणीबाणी अपत्ती महामारी यामुळे राज्य निवडणुक आयोगाच्या वेळापञकानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे शक्य झाले नसल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील पंचवार्षिक कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या २८ ग्रामपंचायतींवर २१ प्रशासकांची नेमणूक करण्यात आली असुन पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायतींचा हेच प्रशासक कामकाज पाहणार असल्याची माहीती कोपरगाव पंचायत समितीचे   गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली.
            पंचायत समितीकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे २८ ग्रामपंचायत साठी पंचायत समितीच्या विविध विभागातील  पुढील २१ प्रशासक १२ सप्टेंबर २०२० पासुन  कामकाज पाहतील त्यात अंजनापुर - जाधव एम.के.( विस्तार अधिकारी ) अंचलगाव - रानमाळ डी.ओ. ( विस्तार अधिकारी ग्रा.प.) ओगदी - रानमाळ डी.ओ. ( विस्तार अधिकारी ग्रा,प. )आपेगाव - वाघमोडे बी.बी. ( विस्तार अधिकारी ग्रा.प. ) काकडी - वाकचौरे एस.आर. ( विस्तार अधिकारी कषि ) कोकमठाण - दिघे आर.टी. ( शाखा अभियंता पं.स. ) कोळगाव थडी - श्रीमती खोले यु.एस. ( पर्यवेक्षिका प.स. ) कासली - पंडित एन.बी. ( पर्यवेक्षिका ) घारी - लोखंडे एस.पी. ( विस्तार  अधिकारी ) देर्डे चांदवड - गायकवाड एन.जी. ( शाखा अभियंता पं.स. ) धोंडेवाडी - जाधव एम.के. ( विस्तार अधिकारी ) तिळवणी - वाघमोडे बी.बी. ( विस्तार अधिकारी ग्रा.प. ) नाटेगाव - श्रीमती देवगुणे जी.के. ( पर्यवेक्षिका प.स. ) मनेगाव - वाकचौरे एस.आर. ( विस्तार अधिकारी कृषि प.स. ) मढी बु. - वाघ ए.पी. ( शाखा अभियंता प.स. ) मढी खु. - वाघ ए.पु. ( शाखा अभियंता प.स. ) मळेगाव थडी - ढेपले आर.के. ( केंद्र प्रमुख प.स. ) मायगाव देवी - पाटील आर.व्हि. ( शाखा अभियंता प.स. ) हिंगणी - श्रीमती जायभाय एस.एस. ( पर्यवेक्षिका प.स. ) जेऊर पाटोदा - दिघे आर.टी. ( शाखा अभियंता प.स. ) सोनारी - ढेपले आर.के. ( केंद्र प्रमुख प.स. ) सांगवी भुसार - श्रीमती भेडेकर एस.डी. ( पर्यवेक्षीका प.स. ) सवंत्सर - वाघीरे पी.डी. ( कृषि अधिकारी प.स. ) वेळापुर - निळे के.एम. ( केंद्र प्रमुख प.स. ) रवंदे - श्रीमती भोईर व्हि.डी. ( केंद्र प्रमुख प.स. ) येसगाव - शिंदे पी.एम. ( शाखा अभियंता प.स. ) उक्कडगाव - सातपुते एस.ई. ( शाखा अभियंता प.स. ) टाकळी - साबळे बी.के. ( विस्तार अधिकारी कृषि ) असुन प्रशासक म्हणून निवड झालेल्यांनी आपल्या मुळ पदाचे कामकाज पाहुन प्रशासक म्हणून कामकाज करणे बंधनकारक राहील ,शासनाच्या निर्णयातील तरतुदीचे पालन करणे ,ग्रामपंचायत अधिनीयम १९५९ मधील  सर्व अटी शर्तीचे पालन करुन कामकाज करणे बंधन कारक राहील तसेच सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडणे बंधनकारक राहील .आर्थिक स्वरुपाचे सर्व अधिकार व लेखा संहितेच्या आधीन राहुन पार पाडतील हेच प्रशासक पुढील आदेश येईपर्यंत कामकाज पाहतील प्रशासकास ग्रामपंचायत कामकाजामध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही . कामकाज करताना गैरवर्तन दिसुन आल्यास प्रशासक कारवाईस पाञ राहतील अशी माहीती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंक्षि यांनी दिली.